श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त महोत्सवाची धूम
बार्शी (कटूसत्य वृत्त):- ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित भगवंत महोत्सवाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आणि सोंगी भारुड स्पर्धेने महोत्सवाची सुरुवात झाली असून माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती आणि श्री भगवंत बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात २८ एप्रिलपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोंगी भारुड स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार तर उत्तेजनार्थ ११ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या सुरुवातीचे कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहात होत असून २१ एप्रिलपासून भगवंत मैदानावर भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment