भीमा नदीत पाणी सोडण्यावर श्रेयवादाची लढाई; नदीकाठचा शेतकरी होरपळला
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- सध्या भीमा नदीपात्रात पाणी नसल्यामुळे पात्र कोरडे ठणठणीत पडले. पाणी कधी सोडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असले अखेर दोन दिवसापूर्वी नदीपात्रात पाणी सोडले असले तरी राजकीय नेत्यांनी मात्र पाणी आमच्यामुळे सोडले असा दावा सोशल मीडियात करू लागले चार दिवसात श्रेयवादाची लढाई जोरात दिसली.
पण श्रेयवादाची लढाईत नदीकाठचा शेतकरी मात्र होरपळून निघाला. पाणी सोडण्याबाबत झालेल्या चालढकलीबद्दल सरकार व पाटबंधारे विभागाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण हे नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे वेळेत पाणी आले तर नदीपात्रात पुरेशा पाणी साठा लावून लगतचे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्याला ऊस पुरवठा करण्याचे काम सातत्याने नदीपट्टा करीत आहे. सप्टेंबर महिन्यात पूर्वपरिस्थितीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्याचे खरीपातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडले. ते नुकसान सहन नदीकाठचा शेतकरी पुन्हा उभारला तर रब्बीत काहीतरी हाताला लागेल या आशेवर असलेल्या शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून नदीपात्रात पाण्याचा ठणठणाटाने चिंतातूर झाला. पाणी सोडण्याबाबत उदासीनता दाखवली जात होती त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत देखील हा पाण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला आला त्यावेळी थोड्याफार प्रमाणात पाणी सोडले मात्र गेल्या काही दिवसापासून नदीपात्र कोरडे पडले आहे नदीपात्रावर अवलंबून असलेल्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना देखील बंद पडल्या शिवाय पिकाला पाणी बंद झाल्याने पिके जळू लागली. सध्या नदीकाठचा शेतकरी पाणी सोडण्यासाठी घसा मोकळा सोडून ओरडत आहे परंतु सरकारची पाणी सोडण्याबाबतची भूमिका लवकर स्पष्ट झाली नाही. याबाबत दैनिक सकाळने १२ एप्रिल च्या अंकात नदीकाठ कोरडा ठणठणीत व कालव्यातून पाणी वाया जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खा. प्रणिती शिंदे यांनी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी १३ एप्रिल रोजी केली. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या दौऱ्यामुळेच पाणी सोडल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली त्यानंतर उजनी विभागाचे पाणी सोडण्याचे पत्र सोशल मीडियात टाकून अनेक नेत्यांनी आपल्यामुळे तर समर्थक आणि आपल्या नेत्यामुळे पाणी सोडल्याचा दावा केला जात आहे.तीन दिवसभर सोशल मीडियातून सत्ताधारी व परस्पर विरोधी नेते व समर्थकांच्या वादात श्रेयवादाची लढाई सुरू होती बिचारा शेतकरी मात्र हतबल होऊन पाहत होता मात्र या श्रेय वादाच्या लढाईत मात्र या भागातील शेतकऱ्याला वाली कोण ? असा सवाल उपस्थित केला.

No comments:
Post a Comment