एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 29, 2026

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे यश

 एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचे यश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व वैचारिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. आरती गायाकवाड हिने कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार – २०२६” प्राप्त करून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे.
कोल्हापूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजकार्य, वैचारिक प्रबोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल आरती गायाकवाड हिची निवड करण्यात आली होती. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तसेच, मा. आ. संतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “भव्य सतेज काव्य संमेलन” मध्ये सहभाग नोंदवत तिने आपली साहित्यिक गुणवत्ता देखील सिद्ध केली. या सहभागाबद्दल तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले व प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते आरती गायाकवाड हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तिच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्तेतच नव्हे, तर सामाजिक जाणीवा व वैचारिक क्षेत्रातही प्रगती साधावी, हा महाविद्यालयाचा उद्देश असून आरती गायाकवाड हिचे यश हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages