डॉ. आंबेडकर जयंतीच्या जल्लोषी मिरवणुकीत देखाव्यांसह प्रबोधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 21, 2026

डॉ. आंबेडकर जयंतीच्या जल्लोषी मिरवणुकीत देखाव्यांसह प्रबोधन

 डॉ. आंबेडकर जयंतीच्या जल्लोषी मिरवणुकीत देखाव्यांसह प्रबोधन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा‌' हा महामंत्र देणारे आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. 19 एप्रिल रोजी सोलापूर शहरात अत्यंत उत्साहात आणि अभूतपूर्व जल्लोषात साजरी करण्यात आली.

विविध सामाजिक संस्था आणि मंडळांनी सादर केलेले प्रबोधनात्मक देखावे यंदाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. डीजेच्या दणदणाटवर तरुणाई थिरकली. ‌'जय भीम‌'च्या जयघोषाने संपूर्ण सोलापूर शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.

शहरातील मुख्य चौक आणि मिरवणूक मार्गावर यंदा वैचारिक प्रबोधनावर भर देण्यात आला. जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेने बाबासाहेबांचे जलतज्ज्ञ आणि अभियंता हे रूप जगासमोर मांडले. धरण निर्मितीतील त्यांचे योगदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उभारलेला डिजिटल देखावा तरुणाईसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. दुसरीकडे, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानने काळाराम मंदिर सत्याग्रहाची प्रतिकृती उभारून मानवी हक्कांच्या लढाईची आठवण करून दिली.

भीमशक्ती बहुउद्देशीय संस्थेने बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकला. ‌'मूकनायक ते प्रबुद्ध भारत पर्यंतचा प्रवास‌' या देखाव्यातून उलगडण्यात आला. भीम मुद्रा संस्थेने ‌'भारतीय चलनी नोटांवर बाबासाहेबांची प्रतिमा असावी‌' ही मागणी देखाव्याद्वारे मांडली. बॉबी ग्रुपचा ‌'डॉ. बाबासाहेबांनी महिलांना दिलेले अधिकार आणि कामगार कायद्यातील सुधारणांची माहिती देणारा चित्ररथ‌' होता.

1927 चा कालखंड जिवंत

पीबी ग्रुप आणि बुद्ध दर्शन संस्थेच्या वतीने महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्षाचा देखावा सादर करण्यात आला. बैलगाडीतून निघालेली बाबासाहेबांची स्वारी आणि ऐतिहासिक लवाजमा पाहून उपस्थितांच्या डोळ्यासमोर 1927 चा कालखंड जिवंत झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages