ब्रह्मांड कलासंस्कारचा जागतिक कला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 21, 2026

ब्रह्मांड कलासंस्कारचा जागतिक कला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

 ब्रह्मांड कलासंस्कारचा जागतिक कला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला





ठाणे (कटूसत्य वृत्त):- ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड कलासंस्कार आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे कोनायझर्स यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेला जागतिक कलादिनानिमीत्त सादर केलेला भव्य सोहळा 19 एप्रिल 2026 रोजी सहयोग मंदिर येथे पार पडला. अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यातील उत्तम सादरीकरणांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. ब्रह्मांड कलासंस्कारच्या अध्यक्षा अष्टपैलू कलाकार वर्षा गंद्रे यांच्या कल्पनेतून दरवर्षी साकार होणाऱ्या सोहळ्याचे हे बारावे वर्ष होते. ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव, अध्यक्ष महेश जोशी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे कोनायझर्स चे शाम माडीवाले आणि अध्यक्ष सुचेता ढोबळे यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले आणि मार्गदर्शन केले. 
निवेदनाची जबाबदारी ब्रह्मांड कलासंस्कार खजिनदार अदिती गांगल आणि सचिव बाळकृष्ण पुजारी यांनी पार पाडली. ब्रह्मांड कट्टयाचे जेष्ठ कागदी शिल्प कलाकार  प्रभाकर शेकदार यांनी सुशोभीकरणासाठी सजावट बनवून दीली होती.
कार्यक्रमाची सुरुवात शुभांगी गोगटे यांच्या मंजुळ  आवाजातील ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर एकामागून एक कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. दीप प्रज्वलन जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे आणि पत्नी भावना डुंबरे यांच्या हस्ते झाले व त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नृत्यालंकार दीपा जोशी आणि त्यांच्या आठ शिष्या आदिरा गांगल, प्रिषा बोरसे, शताक्षी बोकाडे, रुजुला येवले, सोनल कदम, आरुषी तिब्रेवाल , मैत्रेयी वत्स आणि परी राका यांनी पंडित बिरजू महाराजांच्या थुंग थुंग  या रचनेवर नृत्य सादर केले. या बहारदार नृत्यानंतर सुप्रिया लोकरे आणि सुमेधा मोरे यांनी झासी कीं रानी ही कविता नाट्यरूपात सादर केली. भारावून टाकणाऱ्या या सादरीकरणानंतर शार्दुल साने या 10 वर्षाच्या चिमुरड्याने जोशात शिवाजी महाराज स्तुती वंदन प्रस्तुत केली.
अस्मिता चौधरीनी सादर केलेल्या कवितेवर मानसी जोशी  यांनी उत्तम मुद्राभिनय केला. त्यानंतर गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून संगीत सेगमेंट मध्ये यमन, यमन कल्याण ,
,बागेश्री,अहिरभैरव, भैरवी 
रागांवर आधारित हिंदी, मराठी गाण्यांची मेडली सादर करण्यात आली.  
ब्रह्मांड कलासंस्कार आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे कोनायझर्स चे गायक कलाकार यात सहभागी झाले होते. सुप्रिया लोकरे, सुमेधा मोरे, उल्का गावंड, वर्षा गंद्रे, बाळकृष्ण पुजारी , अनुराग चिटणीस, वृषाली साने, अतुल माडीवाले यांनी सादर केलेल्या उत्तमोत्तम गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.  संगीत सेगमेंटची सांगता मिले सूर मेरा तुम्हारा या गाण्याने झाली. कीबोर्ड वर शरद शिधये, तबल्यावर राजन गोरे आणि तालवाद्यावर संजय दीक्षित यांनी सुंदर साथ केली. 
कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभली. तसेच माजी उपमहापौर ऍडव्होकेट सुभाष काळे हे देखील उपस्थित होते. केळकर साहेबांच्या हस्ते नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना
ट्रॉफीज व सर्टीफिकेट सप्रदान करण्यात आली. 
महाराष्ट्राचा सुपरस्टारचा फायनलिस्ट अर्णव बोपलकर या गुणी कलाकाराचा सन्मान करण्यात आला आणि सुंदर असे गाणे गाऊन त्यानी सर्वांकडून फायनल साठी शुभेच्छा मिळवल्या. 
त्यानंतर कलासंस्कार चा सतारवादक दर्श पुजारी यानी सतार वादन सादर केले. काफी रागातील सादरीकरणाला तबल्यावर राजन गोरे यांची साथ लाभली. सतार वादन अतिशय  मंत्रमुग्ध करणारे होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे कोनाईझर्स तर्फे प्रसिद्धीपासून अप्लित असलेल्या हरहुन्नरी कलाकारांना रोवेक्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. गुलशन चंदने,संघमित्रा बेंडखळे आणि अमोल चव्हाण या पुरस्कारांचे मानकरी ठरले. मायरा माडीवाले आणि काव्या पोफळे यांनी गवळण नृत्य सादर केले. बालकलाकार आदिरा गांगल हिने "आहेच मी शूरवीर"   हा एकपात्री प्रयोग सादर करून प्रेक्षकांना हसवले आणि उत्तम दाद मिळवली. सेक्सोफोनीसट पाहुणी कलाकार आचल म्हात्रे हिचे कौशल्य पाहून प्रेक्षक थक्क झाले. रुपेरी वाळूत,  शारद सुंदर चंदेरी राती, ओ हंसिनी अशा गाण्यांवर प्रेक्षकांनी ठेका धरला. पल्लवी कोळी आणि प्रथमा दिवेकर यांच्या कविता अभिवाचनाला सुद्धा प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव, अध्यक्ष महेश जोशी, कलासंस्कार अध्यक्ष वर्षा  गंद्रे , आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे कोनायझर्स च्या सुचेता ढोबळे आणि शाम माडीवाले यांच्या हस्ते सहभागी सर्व कलाकारांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले आणि सोहळ्याची सांगता झाली पण प्रेक्षकांच्या मनात मात्र हा सोहळा दीर्घकाळ राहील यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages