मोहोळ मतदारसंघात भारनियमनाचा प्रश्न गंभीर-आ. राजू खरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 6, 2026

मोहोळ मतदारसंघात भारनियमनाचा प्रश्न गंभीर-आ. राजू खरे

 मोहोळ मतदारसंघात भारनियमनाचा प्रश्न गंभीर-आ. राजू खरे 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या तीव्र भारनियमनाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. सायंकाळी ६ ते रात्री १० या महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक तसेच शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

बैठकीस अधीक्षक अभियंता माने, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे, तसेच उपअभियंते देवकर (कुरुल) आणि पटवेकर (मोहोळ) उपस्थित होते. यावेळी मतदारसंघातील विविध भागांमध्ये डीपी जळणे, वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळणे, विद्युत तारा तुटणे अशा तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. विशेषतः नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याच्या ठोस सूचना आमदार खरे यांनी दिल्या.

दरम्यान, मतदारसंघातील वीज समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजू खरे यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages