महापौर विनायक कोंड्याल यांनी एकाच समाजाचा विकास करू नये- फारूक शाब्दी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शाब्दी सोशल अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी सोमवारी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेत येऊन महानगरपालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांची भेट घेतली.सोलापूर महानगरपालिका हद्दीत अनेक मुस्लिम लोकसंख्या वास्तव्य करत आहे.सोलापुरातील मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कर भरते.मग मुस्लिम भागात विकास का होत नाहीय...?असा सवाल फारूक शाब्दी यांनी उपस्थित केला आहे.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या हातात एक हाती सत्ता आली आहे.सत्तेत आल्यापासून भाजपचे महापौर विनायक कोंड्याल हे फक्त एका समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी,दर्गाह यांना विकास निधी का दिला जात नाही असा सवाल उपस्थित करत फारूक शाब्दी यांनी संताप व्यक्त केला.
सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारा विरोधात फारूक शाब्दी यांनी एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवत तब्बल 60 हजार मत घेतली होती.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचा राजीनामा देत,फारूक शाब्दी यांनी एमआयएमपासून स्वतःला दूर करून घेतले.सोमवारी फारूक शाब्दी यांनी शाब्दी सोशल अँड वेल्फेअर असोसिएशन मार्फत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले.फारूक शाब्दी यांना कोणत्याही पक्षाची गरज नाही,सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांसाठी आम्ही एकटे लढू,आणि फारूक शाब्दी हे नाव एक पार्टी आणि पक्षा सारखे आहे.यावेळी फारूक शाब्दी यांच्या सोबत कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment