अकलूज बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार फुलला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

अकलूज बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार फुलला

 अकलूज बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार फुलला





अकलूज (कटूसत्य वृत्त):- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार आवारामध्ये शुक्रवारी जनावरे बाजार भरविण्यात आलेला होता. त्यास शेतकरी व व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
    राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुचनेनुसार जनावरांचा बाजार सोमवार बरोबरच प्रत्येक शुक्रवारी भरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे पहिल्याच शुक्रवारी ३०० गाय व म्हशीची आवक झाली होती.चांगल्या गाय व म्हशी बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पायाभूत सुविधांबरोबरच सुरक्षितता व व्यवहारातील पारदर्शीपणा आणण्यासाठी बाजार समितीच्या वतीने उपाययोजना केलेली होती. जनावरे बाजार आठवड्यातून दोनदा भरल्याने माळशिरस तालुक्यासह इतर तालुक्यातील व्यापारी तसेच शेतक-यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार असून दुस-या बाजारासाठी जाणारा खर्चही वाचणार आहे. येथुन पुढे दर शुक्रवारी जनावरांचा बाजार भरविण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. शेतकरी व व्यापा-यांना कोणतीही अडचण वाटल्यास बाजार समितीच्या अधिका-यांना त्वरीत भेटावे. त्यांच्यासाठी विशेष कक्ष स्थापन केलेचे बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages