ग्रामीण भागातील डॉक्टरांचे सेवाकार्य अभिमानास्पद- खा. मोहिते-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

ग्रामीण भागातील डॉक्टरांचे सेवाकार्य अभिमानास्पद- खा. मोहिते-पाटील

 ग्रामीण भागातील डॉक्टरांचे सेवाकार्य अभिमानास्पद- खा. मोहिते-पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- "ग्रामीण भागातील डॉक्टर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत. समाजाच्या आरोग्यासाठी त्यांचे योगदान खरोखरच अभिमानास्पद आहे," असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) ७८ वा स्थापना दिवस आणि २७१ व्या जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. निमा अकलूज ब्रँच व माळशिरस तालुका होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. आप्पासाहेब वाघमोडे, डॉ. मिलिंद गुळभिले, डॉ. रमेश बिडवे, डॉ. हरिश्चंद्र सावंत पाटील, डॉ. प्रवीण पाटील व डॉ. शिरीष रणनवरे यांना निमाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच डॉ. विठ्ठल कवितके, डॉ. सपना गांधी, डॉ. आनंद देशमुख, डॉ. रवींद्र पाटील व डॉ. संदीप महामुनी यांना होमिओरत्न २०२७ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील, डॉ. तानाजीराव कदम, डॉ. सुनेत्रा दोशी, डॉ. अंजली कदम, डॉ. नितीन शहा, डॉ. अमोल माने-शेंडगे, डॉ. अभिजीत राजे-भोसले, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. वैष्णवी शेटे, ऋषभ गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्यानंतर कोल्हापूर येथील प्रल्हाद पाटील यांचा 'स्वरतरंग' हा मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम रंगला. डॉक्टरांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी आणि सॅम्युएल हनीमन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. डॉ. सुधीर पोफळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शबाना शेख व डॉ. प्रीती पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages