अखेर सोलापूर झेडपीच्या विषय समितीचे 83 सदस्य बिनविरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2026

अखेर सोलापूर झेडपीच्या विषय समितीचे 83 सदस्य बिनविरोध

 अखेर सोलापूर झेडपीच्या विषय समितीचे 83 सदस्य बिनविरोध




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट तालुक्यातील झेडपीच्या दोन सदस्यांच्या नाट्यमय निर्णयानंतर अखेर सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे 83 सदस्य बिनविरोध झाले आहेत. यामध्ये शिवराज म्हेत्रे यांची शिक्षण व पंडित तानवडे यांची अर्थ समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेची विशेष सभा झाली. सभेत विशेष समितीच्या सदस्य पदासाठी अर्ज घेण्यात आले. ठरल्याप्रमाणे भाजप व इत पक्षांच्या सदस्यांनी अर्ज भरले. पण यात अक्कलकोटमधील सेनेचे सदस्य शिवराज मेहत्रे व तानवडे यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत समाजकल्याण, शिक्षण, अर्थ व बांधकाम समितीसाठी अर्ज भरला. त्यामुळे झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समितीची निवडणूक बिनविरोध झाली असताना विषय समितीच्या सदस्यासाठी निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे ठरल्या वेळेत सभा तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर आली. त्यामुळे भाषेच्या नेत्याची बालाजी सरोवर येथे बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नाराज सदस्यांचे समजूत काढण्यात आली व त्यांना समिती देण्याचे ठरले. त्यामुळे या दोघांनी माघार घेतल्यामुळे अखेर निवडणूक टळली. दुपारी साडेतीन वाजता विशेष सभा होऊन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सभेच्या सचिव स्मिता पाटील यांनी सर्व विषय समितीचे सदस्य बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

विषय समिती सदस्य पदासाठी भाजपने शासलेल्या शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनाही संधी दिली. पण या सदस्य गटाच्या यादीत आपले नाव नसल्याचे कळताच अक्कलकोटच्या शिंदे शिवसेना गटाचे शिवराज मेत्रे व पंडित तानवडे यांनी उमेदवारी दाखल केली. त्यामुळे निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व पक्षनेत्या रश्मी बागल यांनी ही बाब गभीर्याने घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली. त्यानंतर भाजपचे आमदार सरोवर येथे जमले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क करून यातून मार्ग काढला असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री गोरे यांनी तात्काळ तानवडे व मेत्रे यांना न्याय दिला. त्यामुळे निवडणूक टळली. यामुळे प्रशासनावरील ताण कमी झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages