सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर‌ कॉलेजचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर‌ कॉलेजचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना

 सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर‌ कॉलेजचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर येथील विद्यार्थ्यांची साऊथ एशियन गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप 2026 साठी भारतीय संघात निवड झाली असून, त्यामुळे सिंहगड शिक्षण संस्थेचा गौरव वाढला आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा 24 ते 28 एप्रिल 2026 या कालावधीत कोलंबो, श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली आहे.


सब-ज्युनिअर गर्ल्स गटात सिंहगड पब्लिक स्कूलच्या कु. जानवी दिनेश बुराडे (इयत्ता 8 वी) हिची भारतीय संघात निवड झाली आहे. तसेच युथ गर्ल्स संघात कु. श्रद्धा बालाजीसिंग चव्हाण (इयत्ता 10 वी) व कु. आर्या मनीषा रविंद्र पाटणे (इयत्ता 12 वी) यांची निवड झाली आहे.सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने संस्थेसाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब ठरली आहे.


तसेच सब-ज्युनिअर बॉईज भारतीय संघात कु. आदित्य गणेश गुंड (इयत्ता 8 वी), कु. आशिष अविनाश बनसोडे (इयत्ता 9 वी) व कु. समर्थ रमेश मगर (इयत्ता 9 वी) यांची निवड झाली आहे. युथ बॉईज संघात कु. अथर्व वेणुगोपाल गुर्रम (इयत्ता 10 वी) व कु. वरुण विजयकुमार सरडा (इयत्ता 10 वी) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीमुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, शिस्त व क्रीडा क्षेत्रातील समर्पणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असून, देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages