सोलापूर ZP चा अध्यक्ष 18 मार्चला ठरणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

सोलापूर ZP चा अध्यक्ष 18 मार्चला ठरणार

 सोलापूर ZP चा अध्यक्ष 18 मार्चला ठरणार




तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची 18 मार्च रोजी निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापतींची निवड ही 12 मार्च रोजी केली जाणार आहे.

या निवडीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अकरा अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे. अकरापैकी सात पंचायत समितींवर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. तसेच इतरही ठिकाणी आपल्याच पक्षाचा सभापती बसविण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली डावपेच आखले जात आहेत, त्यामुळे सभापती निवडीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, पंचायत समिती सभापती आणि उपसभातींची निवडी १२ मार्च रोजी होणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकरा जणांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात करमाळ्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, माढ्यासाठी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, बार्शीसाठी उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याकडे उत्तर सोलापूरची जबाबदारी असणार आहे.

उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांच्याकडे मोहोळची, पंढरपूरसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्याकडे माळशिरसची, सांगोल्यासाठी प्रांतधिकारी भैरप्पा माळी, उपजिल्हाधिकरी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे मंगळवेढा, दक्षिण सोलापूरसाठी उपजिल्हाधिकरी अंजली मरोड, प्रांताधिकारी सुमीत शिंदे यांच्याकडे अक्कलकोटची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

ग्रामविकास विभागाकडून २५ फेब्रुवारी दिलेल्या सूचनांच्या आधारे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील नियम ६७ व ६८ नुसार सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया हे अधिकारी पार पाडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतात.

हात उंचावून मतदान

पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींची निवड ही बहुमताने निवड होते. सदस्यांनी हात उंचावून मतदान करायचे आहे. ज्या उमेदवाराच्या बाजूने सर्वाधिक मतदान, तो सदस्य सभापती आणि उपसभापती होईल. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडही अशाच पद्धतीने होणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट 
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा 68

भाजप - 38
राष्ट्रवादी अजित पवार - 11
राष्ट्रवादी शरद पवार - 5
शिवसेना (शिंदे गट) - 8
शेकाप - 3
करमाळा स्थानिक आघाडी - 2
तीर्थक्षेत्र विकास आघाडी - 1

चौकट 

जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमधील पक्षीय बलाबल

भाजप : 07 (अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळ, मंगळवेढा)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : 01 (माळशिरस)

भाजप-राष्ट्रवादी युती : 01 (करमाळा)

सांगोला तालुका विकास आघाडी : 01 (सांगोला)

समान संख्याबळ (पंढरपूर) : राष्ट्रवादी काँग्रेस : 08, भाजप : 08

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages