अंकुर’ संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव
‘महिलांचे संघटनच राष्ट्राची खरी शक्ती’: प्रणिता कांबळे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'अंकुर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर' यांच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी सन्मानमूर्तींनी उपस्थित महिलांना स्वबळावर प्रगती करण्याचा कानमंत्र दिला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व सोलापूर जिल्ह्याच्या बार्टी चे प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "केवळ कुटुंबाची जबाबदारी न सांभाळता आजची महिला प्रशासकीय, वैद्यकीय आणि तांत्रिक अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे. महिलांचे संघटन आणि आत्मबल हीच राष्ट्राच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे."
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये ॲड. प्रियंका राजन गोरंटी, डॉ. अरुणा भिसे, सुप्रिया मोहोळकर, पोलीस अर्चना जामदार, कल्याणी कांबळे, संगीता पाटील, अर्चना नारायणकर, निकिता घनाते, पोलीस ज्योती बेटकर, निलिमा वळसंगकर, डॉ . तेजस्विनी कांबळे, आम्रपाली लोखंडे, यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष किरण खरटमल यांनी प्रास्ताविकात सामाजिक कार्यात महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी उपाध्यक्ष अश्विनी लोंढे, सचिव चंद्रकांत जगताप, सहसचिव अरुणा खरटमल आणि प्रियांका जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रथमेश बुरुडकर, नितीश वेदपाठक, आनंद पुजारी, प्रसाद सज्जन, बाबासाहेब सदाफुले,मयूरेश भोईटे, प्रथमेश कासार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment