भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालाजी अमाईन्स लि., रोटरी क्लब ऑफ सोलापूर, आणि शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, चिंचोळी MIDC येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ४५७ लाभार्थींनी तपासणी करून घेतली. त्यामध्ये १३६ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असून १९० जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराचा उद्देश नागरिकांना नेत्र आरोग्याबाबत जागरूक करणे तसेच गरजू रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व आवश्यकतेनुसार चष्मा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे असा होता.
बालाजी अमाईन्स तर्फे CSR फंडातून यासाठी मदतनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा रोटे. धनश्री केळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली. प्रकल्प प्रमुख रोटे. मितेश पंचमिया यांनी प्रास्ताविकातून शिबिराचा उद्देश सांगितला. तसेच या शिबिरानंतर तामलवाडी भागात आणि ST कर्मचाऱ्यांसाठी देखील असेच नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यानंतर बालाजी अमाईन्स लि. चे CSR चे श्री. अनिल विपत यांनी कंपनीच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देत या प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर सुधाळ (शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय) यांनी नेत्र आरोग्याचे महत्त्व आणि H. V. देसाई नेत्र रुग्णालय तसेच शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाची माहिती दिली. कार्यक्रमास सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे श्री. गणेश सुत्रावे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असलेले रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे नियुक्त प्रांतपाल DGE जयेशभाई पटेल यांनी आपल्या मनोगतातून समाजहितासाठी रोटरी क्लबकडून राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पांची माहिती दिली. तसेच येत्या काळात रोटरी डिस्ट्रिक्ट कडून जे मेगा प्रोजेक्ट घेण्यात येणार आहेत त्याविषयी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी अमाईन्स लि. चे पूर्णवेळ संचालक श्री. राजेश्वर रेड्डी यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा उपक्रमांना कंपनीचा कायम पाठिंबा राहील आणि अनेक सेवाभावी संस्था एकत्र येऊन असे मोठे प्रकल्प नक्कीच यशस्वी करू शकतात असे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप बालाजी अमाईन्स लि. चे CSR प्रतिनिधी श्री. दत्तप्रसाद सांजेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. सचिन सुतार यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांना नेत्र तपासणी व आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून समाजातील गरजू घटकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सदस्य व बालाजी अमाईन्स लि चे अधिकारी निलेश फोफलिया, आशिष मेहता, सौ. पारूल पटेल, सुनील माहेश्वरी, शिवाजी उपरे, संजय मडूर, सचिन मोरे ,अमोल गुंड , बसवराज अंटद, गजानन काळे,गणेश नवगिरे,आदित्य जैन ,अमोग पांडे,संतोष कणेकर, डॉ. राजीव मोहोळकर, मकरंद बसवंती, विशाल वर्मा, बी. एस. मुंदडा यांनी विशेष सहकार्य केले.

No comments:
Post a Comment