प्रा. वामसी प्रिथम पिंगाली यांना गणित रत्न २०२६' पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 30, 2026

प्रा. वामसी प्रिथम पिंगाली यांना गणित रत्न २०२६' पुरस्कार जाहीर

 प्रा. वामसी प्रिथम पिंगाली यांना गणित रत्न २०२६' पुरस्कार जाहीर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गणित क्षेत्रातील सखोल आणि मूळ संशोधनासाठी दिला जाणारा मानाचा ५ वा गणित रत्न २०२६' पुरस्कार बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (आयएससी),  प्रा. वामसी प्रिथम पिंगाली यांना सोलापूर येथे प्रदान केला जाणार आहे. मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी, सकाळी १० वाजता, सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजच्या 'कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सभागृहात' होणार आहे, अशी माहिती लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
         प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी खा. पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार पिंगाली यांना प्रदान करण्यात येईल. तसेच खा. निकम यांच्या हस्ते संगमेश्वर कॉलेजच्या नूतन सभागृहाचे उ‌द्घाटनही पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे हे भूषविणार आहेत. याप्रसंगी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. "गणित रत्न" हा पुरस्कार अत्यंत मानाचा समजला जातो. यामध्ये सन्मानमूर्तीला १ लाख ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
          प्रा. पिंगाली यांच्या जागतिक स्तरावर नावाजलेल्या गणितीय संशोधनाची दखल घेऊन प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेतर्फे त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. हा देश स्तरावरील सोहळा प्रथमच सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र वि‌द्यापीठाचे प्रथम कुलगुरु व गणितज्ञ प्रा. डॉ. एन. के. ठाकरे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०१३ मध्ये त्यांच्या शिष्य, गणितप्रेमी व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन "प्रोफेसर ठाकरे गौरव समिती" स्थापन केली. जमा झालेला निधी न स्वीकारता त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा "गणित रत्न पुरस्कार" सुरू करण्याचा आग्रह प्रा. ठाकरे यांनी धरला. त्यानुसार २०२१ मध्ये ट्रस्ट आणि २०२२ मध्ये सोसायटी म्हणून नोंदणीकृत झालेल्या प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेमार्फत या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
गणित रत्न पुरस्कारासाठी उमेदवारांची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमान १० नामांकित गणितज्ञांच्या समिती‌द्वारे केली जाते, ज्यामध्ये परदेशातील तज्ज्ञांचाही समावेश असतो. आतापर्यत २०२२ मध्ये प्रा. महेश काकडे (आयआयएससी, बेंगळुरू), २०२३ मध्ये प्रा. नीना गुप्ता (आयएसआय, कोलकाता), २०२५ मध्ये प्रा. अपूर्व खरे (आयआयएससी, बेंगळुरू) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. २०२४ मध्ये योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे पुरस्कार प्रदान करण्यात आला नव्हता.
            या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, गणित प्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन  गणित रत्न समिती समन्वयक प्रा. बी. एन. वाफरे
आणि लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे तांत्रिक संचालक आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
        सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजमध्ये 'कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सभागृह बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे 400 जणांची आसन व्यवस्था आहे. या नूतन सभागृहाचे उ‌द्घाटनही पार पडणार आहे. या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचा आनंद आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages