सांगोला नगरपरिषदेमार्फत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

सांगोला नगरपरिषदेमार्फत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात

 सांगोला नगरपरिषदेमार्फत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात

सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोला नगरपरिषदेच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ७ व ९ मार्च रोजी विविध स्पर्धा व ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

दि. ७ मार्च रोजी पाककला स्पर्धा व ग्रुप डान्स स्पर्धा पार पडल्या. पाककला स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत अफरीन पठाण, मनीषा हुंडेकरी, नीता लाटणे व राजाबाई मस्के या विजेत्या ठरल्या.

ग्रुप डान्स स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत युवा ग्रुपने प्रथम, सखी ग्रुपने द्वितीय, धुरंदर ग्रुपने तृतीय तर चौंडेश्वरी ग्रुपने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.

दि. ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘होम मिनिस्टर’ तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती छायाताई मेटकरी, डॉ. निकिताताई देशमुख, अपेक्षाताई पाटील, पंचायत समिती सदस्या राणीताई पाटील, वंदना शेळके, डॉ. नेहा साळुंखे-पाटील, डॉ. मेघना देवकाते, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, सुनंदाताई घोंगडे, पूजाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका राणीताई माने यांनी केले. तर डॉ. निकिताताई देशमुख व छायाताई मेटकरी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी बक्षीस वितरण समारंभात कवयित्री पुष्पाताई मिसाळ, मनीषा ठोंबरे, अर्चना देसाई, सुवर्णा तेली व हर्षदा गुळमिरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रशासनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायली पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेच्या कर अधिकारी प्रियांका पाटील, अस्मिता निकम तसेच इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages