शबरी आवास योजनेतून ५४ लाभधारकांना घरकुलासाठी जागा; शेळका धानोरा येथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण
कळंब (कटूसत्य वृत्त):-
कळंब तालुक्यातील शेळका धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत शबरी आवास योजनेतून सन २०२३–२४ मध्ये मंजूर झालेल्या ५४ लाभधारकांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय अर्थसहाय योजना अंतर्गत जागा नसलेल्या लाभधारकांच्या प्रस्तावांची कार्यवाही पूर्ण करून दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, कळंब येथे जागेच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या उपक्रमामुळे अनुसूचित जमाती (ST) समाजातील लाभधारकांना हक्काचे घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून कळंब तालुक्यातील हा सर्वांत मोठा उपक्रम मानला जात आहे. घरकुलासाठी जागा मिळाल्यामुळे लाभधारकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनांक घोष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. अनुप शेंगुलवार तसेच जिल्हा प्रोग्रामर श्री. मेघराज पवार यांनी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन व सूचना दिल्या. तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी वर्ग-१ श्री. विनोद जाधव, विद्यमान गटविकास अधिकारी श्री. सोपान अकेले, घरकुल विभागाचे श्री. हजारे (पी.आर.), डेटा ऑपरेटर श्री. गुरुराज पांचाळ व ग्रामगृह निर्माण अभियंता श्री. तेजस पवार यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले.
जागा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावेळी गटविकास अधिकारी श्री. सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीम. मनिषा सुकाळे, विस्तार अधिकारी श्री. साळुंखे, अॅड. रविंद्र शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. साळुंखे मॅडम, सरपंच श्री. सुधाकर इंगळे, पंचायत समिती सभापती श्रीम. राजश्री वरपे, उपसभापती श्रीम. प्रणीता चव्हाण तसेच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच श्री. प्रणव चव्हाण, माजी सभापती श्री. दत्ता साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संजय आडसुळ, भाजप तालुका सरचिटणीस श्री. संतोष कसपटे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment