राजीव माने यांची अध्यक्षपदी पुनर्निवड; मिलिंद साळुंखे उपाध्यक्षपदी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

राजीव माने यांची अध्यक्षपदी पुनर्निवड; मिलिंद साळुंखे उपाध्यक्षपदी

 राजीव माने यांची अध्यक्षपदी पुनर्निवड; मिलिंद साळुंखे उपाध्यक्षपदी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा राजीव माने यांची, तर उपाध्यक्षपदी मिलिंद साळुंखे यांची निवड एकमताने करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्रैवार्षिक (२०२५-२६ ते २०२८-२९) निवडणुकीत के. सर्जे राव जाधव विकास आघाडी पॅनलने सातही जागांवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे संस्थेच्या सत्ताकारणात या पॅनलची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवीन विश्वस्तांच्या बैठकीत विकास सुरवसे यांनी अध्यक्षपदासाठी राजीव माने, तर उपाध्यक्षपदासाठी मिलिंद साळुंखे यांची नावे सुचविली. या प्रस्तावाला महादेव माने यांनी अनुमोदन दिल्यानंतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी नूतन विश्वस्त प्रकाश पडवळकर, बाळासाहेब मोरे, महादेव माने, विकास सुरवसे आणि तानाजी चव्हाण यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच मावळते अध्यक्ष प्रल्हाद जाधव व उपाध्यक्ष अमर शिंदे यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अॅड. शरदराव फुटाणे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेशचंद्र सूर्यवंशी, स्वामीराव पाटील, शंकर पवार, संतोष जाधव, शरद जंगाले, विकास गोडसे, प्रवीण घाडगे, गोटू माने, माणिक बिराजदार, विक्रम गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार
सभासदांनी सलग दुसऱ्यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवून तिचा लौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार अध्यक्ष राजीव माने यांनी व्यक्त केला. कै. आमदार बी. टी. माने, स्व. सर्जे राव जाधव व कै. उद्धवराव जंगाले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा विस्तार झाला असून, ही विकासाची परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१९२७ साली स्थापन झालेल्या या तालुक्यातील जुन्या व नामांकित संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही माने यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages