युद्धामुळे केळी निर्यातीवर परिणाम - खा मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

युद्धामुळे केळी निर्यातीवर परिणाम - खा मोहिते पाटील

 युद्धामुळे केळी निर्यातीवर परिणाम - खा मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- इराण-इस्राईल-अमेरिका युद्धामुळे केळी निर्यातीवर परिणाम होऊन केळीसह इतर फळे भाजीपाला यांचे दर कोसळले आहेत. केळीचा दर १८ ते २३ रूपयावरून ८ ते १० रूपयांवर आला आहे. आखाती देशात जाणारे केळीचे ४०० कंन्टेनर बंदरांच्या ठिकाणी अडकले आहेत. फळपिकांच्या बाजारभावात सरकारने हस्तक्षेप करण्याबरोबरच निर्यात सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत कृषी विभागाच्या मागण्यांवर बोलताना केली.

देशातील ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना देशातील

शेतकरी आज गंभीर संकटात आहे. उत्पादन खर्च वाढतोय, पण उत्पन्न नाही. योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. हमीभाव केवळ कागदावर राहिला आहे. शेतीसाठीचे सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत, त्यामुळे शेती. अजूनही पावसावर अवलंबून आहे. अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या तरतुदी पाहिल्या की वाटते शेती हा सरकारसाठी दुय्यम विषय आहे.

सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत. सरकार बोलते एक आणि जमिनीवर घडते काहीतरी वेगळेच. अर्थसंकल्प पाहिला की लक्षात येते, शेतकऱ्यांना अजूनही प्राधान्यक्रम नाही. २०२६-२७ सालातील अर्थसंकल्पात कृषी विभागासाठीची तरतूद 1 लाख 30 हजार कोटी इतकी आहे.ही वाढ केवळ कागदावर दिसते.महागाई वाढली आहे. खत बियाण्यांचे दर वाढले,इंधन दर वाढले,मात्र सरकार शेतकऱ्यांना कुठलीच मदत करत नाही.हा शेतकऱ्यांवर अन्याय नाही का? असा सवाल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित केला . तर माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या करमाळा व आसपासच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जाते. निर्यातक्षम केळी उत्पादनातून 20 हजार कोटीचे उलाढाल  होते. केळीवर शेतकरी मजूर कोल्ड स्टोरेजस अवलंबून आहेत. पंधरा हजार केळी कंटेनर गत वर्षी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाले होते. करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र सुरू करण्याचे आग्रही मागणी यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages