अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या पैलवानास अटक
50,200/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण जिल्हयामधील बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे अवैध अग्निशस्त्राचा वापर करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म. इसाक अबास मुजावर यांचे पथक टेंभूर्णी पोलीस ठाणे गुरनं 145/2026 बीएनएस 304(2) प्रमाणे दाखल गुन्हयाचे समांतर तपासकामी टेंभूर्णी हद्दीतील करमाळा चौक येथे हजर असताना, पथकातील पोहेकॉ/ 853 मोहन शामकर्ण मनसावाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे बेंबळे ता. माढा जि. सोलापूर येथील पैलवान नामे अभिषेक उर्फ भैय्या गायकवाड हा टेंभूर्णी शहरातील हॉटेल सागर, परमिट रुम येथे अवैध अग्निशस्त्रासह बसला असून त्याचे अंगावर क्रिम रंगाचा फुलशर्ट व निळया रंगाची जिन्स घातलेली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार लागलीच सदरीची बातमी टीम मधील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म.इसाक अबास मुजावर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना कळविली असता, त्यांनी तात्काळ कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्यांनतर लागलीच दोन पंचासह हॉटेल सागर परमिट रुम येथे जावून बातमी प्रमाणे पाहिले असता, हिरव्या रंगाचे शेडनेट मध्ये बातमीप्रमाणे एक इसम बसलेला दिसला, त्यास ताब्यात घेवून त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव अभिषेक उर्फ भैय्या गायकवाड, वय 28 वर्षे, रा. बेंबळे ता. माढा जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचे जवळ जावून त्याची अंगझडती घेतली असता, कंबरेच्या उजव्याबाजूस मॅगझीनसह एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक जिवंत राउन्ड मिळून आले.
त्याप्रमाणे टेंभूर्णी पोलीस ठाणे येथे गुरनं 159/2026 भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3,7, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास टेंभूर्णी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहे. सदर आरोपीस अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 20/03/2026 पर्यंत 02 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली टेंभूर्णी पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस अधिक्षक आत्राम, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म.इसाक अबास मुजावर, सफौ/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय डोंगरे, संदीप हुलगे, चालक सतिष बुरुकुल यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.
.png)
No comments:
Post a Comment