बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन

 बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालाजी अमाईम्स कंपनीच्यावतीने बीबीदारफळ येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन आज बालाजी अमाईन्स कंपनीचे जनरल मॅनेजर गोविंद मेंचेकरे यांच्या हास्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेतील शिक्षक व पालकसमिती सदस्यांनी बालाजी अमाईन्स कंपनीच्या संचालक मंडळा कडे शाळेत स्वच्छतागृहाची व भोजनकक्षाची मागणी केली याचा बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी व सर्व संचालक मंडळानी शाळेत एक स्वच्छतागृहाचे युनिट बांधकामास मंजुरी दिली.

या कार्यक्रमास कंपनीचे डी. जी. एम विनय दुर्गम व सीएसआर प्रमुख अनिल विपत, लक्ष्मण अडसूळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापिका श्रीधर साखरे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापकांनी बालाजी अमाईन्सच्या सर्व संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार मानले. या कार्यक्रमास शाळा २ च्या मुख्याध्यापिका वनिता गवळी तसेच शालेय समिती अध्यक्ष सोमनाथ घोंगडे युवा प्रतिष्ठान चे शैलेश साठे तसेच बालाजी अमाईन्स चे सचिन मोरे, प्रसाद सांजेकर, अमोल गुंड, बसवराज अंटद, वसंत साठे महाराज तसेच सर्व शिक्षक व पालक गावातील नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages