प्रकाश गायकवाड यांनी सापडलेला मोबाईल केला परत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

प्रकाश गायकवाड यांनी सापडलेला मोबाईल केला परत

 प्रकाश गायकवाड यांनी सापडलेला मोबाईल केला परत




अकलूज (कटूसत्य वृत्त):- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अकलूजमध्ये प्रामाणिकतेचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश गायकवाड यांनी सापडलेला सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मोबाईल प्रामाणिकपणे मालकाला परत करून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली.
महर्षी चौक, अकलूज येथील जनसंपर्क कार्यालयासमोर गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास प्रकाश गायकवाड आणि ‘महर्षि  डिजीटल न्यूज चे संपादक सागर खरात कार्यालयाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला बॉक्स पॅक अवस्थेत एक ओप्पो मोबाईल पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ तो उचलून पाहिला असता त्यावर “त्रिमूर्ती मोबाईल” असे लिहिलेले आढळले.
मोबाईलचा मालक शोधण्यासाठी त्यांनी काही वेळ त्या ठिकाणी थांबून प्रतीक्षा केली. मात्र, कोणीही न आल्याने त्यांनी गुगलवर शोध घेऊन सदुभाऊ चौक, अकलूज येथील संबंधित दुकानाशी संपर्क साधला. दुकानातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वितरकाशी संपर्क साधण्यात आला असता मोबाईल हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली असल्याचे समजले.
यानंतर जनसंपर्क कार्यालयासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासून खातरजमा करण्यात आली. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालकाला मोबाईल परत देण्यात आला.
प्रकाश गायकवाड आणि सागर खरात यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. यावेळी सचिन नरसाळे व सागर अडगळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages