शौर्य पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

शौर्य पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड

 शौर्य पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड




बार्शी (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील रूई (जि. सोलापूर) येथील शौर्य इंद्रजीत पाटील याची शैक्षणिक वर्ष २०२६ साठी जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली असून, ग्रामीण भागातून मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मल्टी पर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल, गौडगाव (ता. बार्शी) येथे शिक्षण घेत असलेल्या शौर्यने नवोदय प्रवेश परीक्षेत ९७.५० गुण मिळवत सोलापूर जिल्ह्यात ४१ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल कर्मवीर लोहोकर गुरुजी संस्थेच्या वतीने शौर्यचा व त्याचे वडील सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत पाटील तसेच आई सौ. शुभांगी पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

शौर्यच्या यशामागे झुंजकर मॅडम, चव्हाण व प्रवीण बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य काकडे, जीवन लोहोकर, संजय भड, जीवराज गरड यांनी त्याचे विशेष कौतुक केले.

संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड, सचिव पंडितराव लोहोकर सर व सदस्य संतोष भड यांनी शौर्य व त्याच्या पालकांचा सन्मान केला. याशिवाय माधवराव कुतवळ, जनसेवक अमोल कुतवळ, चंद्रकांत पाटील, रावसाहेब पाटील, भागवत उकिरंडे व अमोल देशमुख यांनीही शौर्यचे अभिनंदन करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages