सोलापूर महानगरपालिकेत नववर्षाचे पारंपरिक स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

सोलापूर महानगरपालिकेत नववर्षाचे पारंपरिक स्वागत

 सोलापूर महानगरपालिकेत नववर्षाचे पारंपरिक स्वागत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने गुढी उभारणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थायी समिती अध्यक्षा सौ. रंजिता चाकोते यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी ताई देवकर आणि स्थायी समिती अध्यक्षा सौ. रंजिता चाकोते यांच्या हस्ते विधिवत गुढी उभारण्यात आली. गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. यानिमित्ताने गुढी उभारून नवचैतन्य आणि आनंदाच्या वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी ताई देवकर यांनी गुढी पाडव्याचे महत्त्व अधोरेखित केले. “हा सण नवचैतन्य, नवउमेद आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा आहे. नववर्षात सोलापूर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी शहरवासीयांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

स्थायी समिती अध्यक्षा सौ. रंजिता चाकोते यांनी आपल्या मनोगतात गुढी पाडव्याचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. “हा सण परंपरा, संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. या निमित्ताने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास महानगरपालिकेतील नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे कौन्सिल हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages