सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात; विद्यार्थ्यांना परंपरेची ओळख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात; विद्यार्थ्यांना परंपरेची ओळख

 सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये गुढीपाडवा उत्साहात; विद्यार्थ्यांना परंपरेची ओळख

 




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठी नववर्षाचा प्रारंभ दर्शविणारा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना या सणाचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व समजावे, यासाठी शाळेच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मुख्याध्यापिका शाहीन शेख, उपमुख्याध्यापक प्रकाश नवले, स्मिता नवले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून करण्यात आली. फुलांच्या माळा, कडुलिंबाची पाने, साखरगाठी आणि रेशमी वस्त्रांनी सजविलेल्या गुढीने वातावरणात उत्सवाची रंगत आणली.

या प्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी गुढीपाडव्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगत भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेवटी सर्वांना कडुलिंब-गुळाचा प्रसाद वाटप करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या सण-परंपरांची माहिती मिळून त्यांच्यात संस्कृतीविषयी आदरभाव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages