महिला दिनानिमित्त एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

महिला दिनानिमित्त एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिर

 महिला दिनानिमित्त एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव सोलापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.  बुधवारी (२५ मार्च) आयोजित या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या हस्ते झाले.


या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. शिबिराच्या निमित्ताने मुलींसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. तसेच संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि निरोगी जीवनशैली याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.


या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. माणिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली NSS स्वयंसेवकांनी केली. रक्तसंकलनासाठी डॉ. हेडगेवार ब्लड बँक, सोलापूर यांच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. डॉ. संगीता ओर व डॉ. वैद्य यांनी शिबिराचे वैद्यकीय समन्वय प्रभावीपणे पार पाडले.


शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी NSS स्वयंसेवक तुषार खिल्लारे, समर्थ गायकवाड, कु. तन्वी जाधव आणि कु. ऋतुजा भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे रक्तदानाविषयी जनजागृती होण्याबरोबरच महिलांच्या आरोग्याविषयी संवेदनशीलता वाढण्यास मदत झाली. समाजाभिमुख मूल्यांची जपणूक करत महाविद्यालयाने सामाजिक दायित्वाची प्रभावी जाणीव करून दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages