भोंदू बाबा अशोक खरात याचा केला प्रतिकात्मक एन्काऊंटर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रतीकात्मक पुतळ्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात जोडे मारून व महिला भगिनींच्या हस्ते गोळ्या घालून प्रतीकात्मक स्वरूपात एन्काऊंटर करण्यात आले अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्यावी किंवा सरकारने तात्काळ त्याचा इन्काऊंटर करावा अशी मागणी करण्यात आली.
भोंदूबाबा अशोक खरातने मंत्र-तंत्रविद्येच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे काही धक्कादायक अश्लील व्हिडीओदेखील काढलेले समोर आले आहेत. तसेच या भोंदूबाबाची अनेक मंत्री, बड्या नेत्यांसोबत उठबस होती. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. या खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, अशा सर्वच मंत्री, नेत्यांविरोधात कारवाई करावी अणि
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अनेक महिला घरातून बेपत्ता गायब झालेले आहेत यासाठी गृहखाते अपयशी ठरलेले असून आता महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जलद न्याय मिळण्यासाठी विशेष न्यायालयाची संपूर्ण जिल्ह्यात स्थापना करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलदास जिल्हा उपाध्यक्ष मनिषा कोई शहर कार्याध्यक्ष सोनाली सगर उपजिल्हाध्यक्ष संजीवनी सलबत्ती वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम एडवोकेट बाबासाहेब सपाटे जिल्हा संघटक तेजस शेळके शहर संघटक रमेश भंडारे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष इर्षद नागोरे दक्षिण तालुका अध्यक्ष जैनुद्दीन नदाफ उद्योग कक्षाचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment