स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 14, 2026

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

 स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त शुक्रवार, २० मार्च रोजी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात विविध पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहाटे काकड आरतीनंतर ‘श्री’च्या पादुकांना अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता पाडव्याच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन होणार आहे.

सकाळी ११.३० वाजता नैवेद्य आरतीवेळी मंदिर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते स्वामींना गुढीपाडव्याचा गोड महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.

२० मार्च रोजी पहाटे चार वाजता काकड आरतीने कार्यक्रमास सुरुवात होईल. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात विश्वस्त उज्ज्वला सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने भजन, गुलाल व पुष्प अर्पण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पाळणा भजनगीत व आरती होईल.

दुपारी १२ ते २ या वेळेत मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्षात सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे भोजन देण्यात येणार आहे. प्रकट दिनानिमित्त वटवृक्ष मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages