बचेरी. ( शिंदेवस्ती ) : एम एस ई बी च्या लूज तारांचे स्पार्किंग होऊन मोठी आर्थिक हानी.
हा प्रसंग सलग तीन वर्षे होत आहे, तक्रार देऊनही प्रश्न मिटला नाही. मेन लाईन पोल शिफ्ट करायला अर्ज देऊनही पोल शिफ्ट केला नाही व त्याची दखल घेतली नाही.
सदाशिव नागू शिंदे यांची चिंच बाग व ठिबकचे लाखो रुपयांचे नुकसान. तसेच नारायण म्हंकाळी शिंदे यांची मका पिक ही जळाले.
एम एस ई बी ने तो पोल शिफ्ट करावा त्याशिवाय मेन पुढे चालू करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना जाळून घ्यायची वेळ आणू नये ही एम एस ई बी ला विनंती आहे
सलग तीन वर्षे नुकसान होत आहे. आणि एम एस ई बी ने नुकसान भरपाई म्हणून दमडी सुद्धा दिली नाही.

No comments:
Post a Comment