अक्कलकोटच्या विकासासाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 14, 2026

अक्कलकोटच्या विकासासाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर

 अक्कलकोटच्या विकासासाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांचा विचार करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट नगरपरिषदेला ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.

अक्कलकोट शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासोबतच शहरात येणाऱ्या स्वामीभक्तांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या उद्देशाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.

सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत नगरपरिषद हद्दीत स्वच्छतागृहे व सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी २ कोटी रुपये, अ‍ॅडव्हेंचर पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी २ कोटी ३५ लाख रुपये आणि रस्ते व गटारींच्या काँक्रिटीकरणासाठी ३ कोटी ८० लाख रुपये असा एकूण ८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याशिवाय दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १ कोटी २३ लाख रुपये तसेच कालिका नगर येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमुळे अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांना अधिक गती मिळणार असून पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

या निधीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभल्याचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages