एस.व्ही.सी.एस. प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

एस.व्ही.सी.एस. प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा

 एस.व्ही.सी.एस. प्रशालेत विज्ञान दिन उत्साहात साजरा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी येथे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली थोर शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक धनंजय नकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे व पर्यवेक्षक केदार पटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.                                  विज्ञान दिनानिमित्त प्रशालेत विज्ञान प्रदर्शन, प्रयोग सादरीकरण, मॉडेल व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्य, पर्यावरण संरक्षण, पाण्याची बचत, प्लास्टिक प्रदूषण यासारख्या विषयावर संवादरूपी नाटिका सादर करून वैज्ञानिक जागृती निर्माण केली. काही विद्यार्थ्यांनी विज्ञान गितातून विज्ञानाची किमया पटवून दिले तर काही विद्यार्थी महान भारतीय वैज्ञानिकांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या शोधाबद्दल थोडक्यात माहिती सांगितले. प्रशालेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी 'बॅलन्स डाइट' या विज्ञान नाटकातून पोषणाचे महत्व व सहावीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापराने होणारे हानिकारक परिणाम  व्यक्त केले व कापडी पिशवी वापरण्याचा संदेश दिला.                                      यावेळी बोलताना नकाते म्हणाले, विज्ञानाच्या साहाय्याने देश प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासावे असे आवाहन केले.अनुष्का पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर गौरव समाणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages