महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अॅड. अमृता नागनाथ वाघे यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 30, 2026

महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अॅड. अमृता नागनाथ वाघे यांची निवड

 महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अॅड. अमृता नागनाथ वाघे यांची निवड




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- स्मृतीशेष कृष्णात दादा बोबडे यांच्या सामाजिक व राजकीय विचारांचा वारसा आज नव्या उंचीवर पोहोचल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले. त्यांच्या स्वप्नांना साकार रूप देत, योगेश कृष्णात बोबडे व सुरजा योगेश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अमृता नागनाथ वाघे यांनी जिल्हा परिषदेमधील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाकडे यशस्वी आगेकूच करत मानाची निवड मिळवली आहे.

कृष्णात दादा बोबडे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय प्रवासात सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. समाजातील दुर्बल घटक, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विकासाभिमुख दृष्टीकोन, सर्वसमावेशक विचारसरणी आणि जनतेशी घट्ट नाळ असलेले नेतृत्व यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, महिलांनी राजकारणात पुढे यावे, नेतृत्व स्वीकारावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.

त्याच विचारांची प्रेरणा घेऊन सुशिक्षित व उच्चविद्याविभूषित अॅड. अमृताताई वाघे यांची झालेली निवड ही केवळ एका पदाची निवड नसून, कृष्णात दादा बोबडे यांच्या कार्यपद्धतीचा आणि विचारांचा पुढील टप्पा मानला जात आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार असून, जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण क्षेत्रात अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख कामकाज होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निवडीमुळे बोबडे गट पुन्हा एकदा सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा घेऊन पुढे सरसावला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील महिला, बालक आणि कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना राबवण्यावर भर दिला जाईल, असे संकेतही मिळत आहेत.

दरम्यान, या ऐतिहासिक निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून अॅड. अमृता नागनाथ वाघे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे काम घडेल, तसेच कृष्णात दादा बोबडे यांच्या विचारांचा वारसा अधिक व्यापक स्तरावर रुजेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages