महापालिका सभेत पाणीपुरवठ्यावर गदारोळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 21, 2026

महापालिका सभेत पाणीपुरवठ्यावर गदारोळ

 महापालिका सभेत पाणीपुरवठ्यावर गदारोळ

सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  शहरासह हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्याच्या विषयावर शुक्रवारी झालेल्या महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधत प्रशासनाला धारेवर धरले. पाणी देणार नसाल तर पाणीपट्टी भरणार नाही असा इशारा सत्ताधारी भाजप सदस्यांनी दिला. सभागृहातील सदस्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन लवकरच पाणीपुरवठा विषयावर स्वतंत्र सर्वसाधारण सभा बोलावण्यात येईल, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.

महापालिकेची पहिली सभा महापौर कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आयुक्तांनी सांगितले.

सभेत पहिले दोन तास शहराच्या पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. विस्कळीत पाणीपुरवठ्यावर अनेक

सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी उत्तरे दिली. काही प्रश्नांवर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सभागृहात माहिती दिली.

भाजपच्या रोहिणी तडवळकर म्हणाल्या, लोकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. गेली पंधरा वर्षे नळाला थेंब पाणी येत नसताना बिल भरते. तुम्ही पाणी देणार नसाल तर मी बिल का भरु असा सवाल उपस्थित केला. रात्री बारानंतर काही भागाला टँकरने पाणी देऊ असे उत्तर चौबे यांनी दिले, त्यावर तडवळकर संतापल्या. मी टँकरवर पाणी भरायला जावे का असाही

सवाल त्यांनी केला. आम्ही टँकरमुक्त सोलापूर करु असे लोकांना सांगतो, तुम्ही टँकरने पाणी देण्याचा विषय बोलता. जबाबदारीने बोला असे चौबे यांना खडसावले.

भाजपच्याच वंदना गायकवाड यांनी पुढील महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. स्वीकृत सदस्य वृषाली चालुक्य यांनी पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा मांडला. सोलापूरला जून महिन्यापर्यंत पाऊस नसतो. त्यामुळे पुढचे साडेतीन महिने पाणीपुरवठा कसा करणार आहात असा सवाल केला. त्यावर चौबे यांनी सभागृहाला पाण्याचे नियोजन सांगितले. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी पाण्याबाबत प्रशासनाच्या बेपर्वाईवर बोट ठेवले. अर्चना वडनाल म्हणाल्या, आम्ही कर भरतो तरीही पाणी मिळत नाही.

शिवानंद पाटील, अक्षय अंजीखाने, अझहर हुंडेकरी, वैभव हत्तुरे, अमर पुदाले, किरण देशमुख, श्रीदेवी फुलारे, गणेश वानकर, अनंत जाधव, प्रथमेश कोठे, अविनाश पाटील, किसन जाधव, राजकुमार पाटील इत्यादी सदस्यांनी शहराच्या तसेच आपल्या प्रभागातील पाण्याची समस्या मांडली. यावर चौबे यांनी दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांच्या प्रश्नांना अपेक्षित उत्तरेही मिळाली नाहीत. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी विषयपत्रिका वाचायला सुरुवात केली.


स्काडा प्रणालीवर ५१ कोटी खर्च

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने ५१ कोटी रुपये खर्च करुन स्काडा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीविषयी शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी प्रश्न विचारला. त्यावर व्यंकटेश चौबे यांनी उत्तर दिले. परंतु ते समाधानकारक नव्हते. आयुक्तांनीही खुलासा केला. १४०० कोटींची योजना पूर्ण झाल्यावर स्काडा प्रणालीचा पूर्ण उपयोग होईल असे स्काडा प्रणालीवर ५१ कोटी खर्च

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने ५१ कोटी रुपये

खर्च करुन स्काडा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीविषयी शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी प्रश्न विचारला. त्यावर व्यंकटेश चौबे यांनी उत्तर दिले. परंतु ते समाधानकारक नव्हते. आयुक्तांनीही खुलासा केला. १४०० कोटींची योजना पूर्ण झाल्यावर स्काडा प्रणालीचा पूर्ण उपयोग होईल असे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages