नातेपुते नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीच्या निवडी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते नगरपंचायतच्या विषय समिती सभापती निवडी नुकत्याच पार पडल्या. यामध्ये स्थायी समिती सभापतीपदी अनिता नंदकुमार लांडगे, नियोजन व विकास समितीच्या सभापती अतुल राजेंद्र पाटील, बांधकाम सभापतीपदी सुरेंद्र छगन सोरटे, पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी भारती बापूराव पांढरे तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी दीपिका अमरशिल देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.नातेपुते नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांची सभापती आणि सदस्य पदाची मुदत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपली असल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नातेपुते नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्या सभापती आणि सदस्यांची निवड दुधनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी पीठासीन अधिकारी लक्ष्मीकांत कहार, नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नातेपुते नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा अनिता नंदकुमार - लांडगे यांची पदसिद्ध सभापती म्हणून स्थायी समिती पदी, नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल राजेंद्र पाटील यांची नियोजन व विकास त पदसिध्द सभापती तर बांधकाम सभापती पदी सुरेंद्र छगन सोरटे,पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती पदी भारती बापूराव पांढरे तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी दीपिका अमरशिल देशमुख यांची निवड झाली.या समिती सभापती निवडीप्रसंगी नगराध्यक्षा अनिता लांडगे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नगरसेवक रणजीत पांढरे, नगरसेवक अण्णासाहेब पांढरे, नगरसेवक सुरेंद्र सोरटे, नगरसेविका संगीता काळे, नगरसेविका स्वाती बावकर, नगरसेविका भारती पांढरे, नगरसेविका दीपिका देशमुख तसेच शिवसेनेचे नेते अमोल ऊराडे बाळासाहेब काळे, रणवीर देशमुख,करण देशमुख, शुभम सोरटे उपस्थित होते. सभेचे कामकाज सभा अधिक्षक प्रदीप वनसाळे यांनी पाहिले.

No comments:
Post a Comment