कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 3, 2026

कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात.

 कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात.




थेऊर ( प्रविण शेंडगे ) : मौजे कुंजीरवाडी ता. हवेली येथील थेऊरफाटा ते आंबेकरमळा-चौरेवस्ती येथे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा प्रश्न निकाली निघाला आहे. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, या कामासाठी 10 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. त्यासोबत धुमाळमळा येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकारण करण्यासाठीही, 10 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. दोन्ही कामे उद्यापासून सुरू होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य युवराज काकडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही जागा निवडून आल्यावर, 1 महिन्यात दोन्हीही कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. त्याच अनुषंगाने दोन्ही कामे एक महिन्याच्या आत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. कोमल संदेश आव्हाळे, हवेली पंचायत समितीचे सदस्य युवराज हिरामण काकडे, माजी सरपंच संतोष कुंजीर पाटील, सचिन तुपे, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, दत्तात्रय कुंजीर, विकास निगडे, गोकुळ ताम्हाणे, शिवाजी कुंजीर, भरत निगडे, नयन तुपे, योगेश गायकवाड, दिपक ताम्हाणे, कैलास तुपे, पोलीस पाटिल मिलिंद कुंजीर, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसो घुले, संभाजी गायकवाड, मुकेश गायकवाड, प्रकाश धुमाळ, नंदकुमार धुमाळ, दिलीप आंबेकर, विश्वनाथ गाढवे, सुभाष कुंजीर, रामदास कुंजीर, दादासो काकडे, संतोष शिंदे, अविनाश धुमाळ, स्वप्नील काळभोर, सोमनाथ धुमाळ, विकास धुमाळ, निर्मलाताई धुमाळ, गोरख तुपे, नवनाथ आंबेकर, विशाल धुमाळ, अमोल धुमाळ, सतीश कुंजीर, गौरव कुंजीर, अमर कुंजीर, संदीपआबा धुमाळ, बाबा धुमाळ, माऊली सावंत आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कुंजीरवाडीसह जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे संदेश आव्हाळे व युवराज काकडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages