तडवळे येथे नामजप सोहळा संपन्न
कसबे तडवळे(कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ नानिजधाम यांच्या कृपा आशिर्वादाने तडवळे सेवाकेंद्राच्या माध्यमातून नामजप सोहळा आयोजित करण्यात आला होता दर सालाप्रमाणे याही वर्षी तडवळे सेवाकेंद्रात नामजप सोहळा आयोजनामध्ये मृदुंगचार्य जालिंदर बाप्पा सस्ते वारकरी संस्था येडशी येथील विद्यार्थ्यांना रोजनिशी मध्ये लागणारे स्वयंपाक साहित्य (भांडी) देऊन कौतुकास्पद उपक्रम राबवला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले स्वामीभक्त संग्राम देशमुख , गावचे उपसरपंच हरून शेख, राजाभाऊ लोंढे,विशाल जमाले, पं.स सदस्य जगन्नाथ विभुते, ग्रा.प. सदस्य सुभाष धनके, धनाजी होगले गावचे शंकर पवार, सुनील ढिकरे, महादेव सस्ते तसेच, जिल्हाअध्यक्ष संतोष केसकर, सचिव बा.कानडे, दिनेश देटे, बालाजी थोरात उपस्थित होते. कार्यक्रमास प्रभाकर गुळवे, रामलिंग सुरवसे ,अशोक देशमुख, गणेश गायकवाड, जयसिंग भोईटे, अनिकेत पवार,राज नाडे, आबा कटवते, नवनाथ कदम, धनाजी सावंत, प्रदीप शिंदे, बाळू कोरडे, भगवान कोळी, नितीन पोळ, गोपाल कांबळे, समाधान पवार, स्वप्नील भांड, राज सुरवसे, भैया सुरवसे, शुभम भांड, रमेश मिसळ भाऊ सौदागर, व तडवळे सेवा समिती यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद सोकांडे यांनी केले. कार्यक्रमास गावातील तसेच परिसरातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:
Post a Comment