कुशल व ज्ञानी युवकांनी शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन करावे- कृषी अधिकारी देशमुख
माढा (कटूसत्य वृत्त):- देशात हरितक्रांती झाल्यापासून कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत.विविध प्रकारचे तंत्रज्ञान व कौशल्याच्या जोरावर अनेक शेतकरी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी व्यापारी पद्धतीने शेती करतात परंतु काही अशिक्षित शेतकऱ्यांना भरपूर कष्ट व मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पादन व उत्पन्न मिळत नाही तेंव्हा जे सुशिक्षित व कुशल तंत्रज्ञानी बेरोजगार युवक कृषीपूरक व्यवसाय व उद्योग सुरू करतात त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन करावे.शक्य असेल तर मोफत अथवा माफक दरात विविध सेवा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून त्यांची प्रगती व सुधारणा होऊ शकेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
ते मानेगाव ता.माढा येथे सुरज ॲग्रो सर्व्हिसेसचे उद्घाटन करताना बोलत होते.
प्रास्ताविक धानोरे देवीचे माजी सरपंच औदुंबर देशमुख यांनी केले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य तानाजी देशमुख यांनी सांगितले की,सध्या शेती व्यवसाय व शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. तेंव्हा जे गोरगरीब व गरजू शेतकरी आहेत त्यांना मदत व सहकार्य करणे हे शासन,कृषी विभाग व मोठ्या सधन शेतकऱ्यांचे आद्यकर्तव्य आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांना कृषीविषयक बाबींची शास्त्रशुद्ध माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे अचूक तंत्र अवगत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांच्या पदरी घोर निराशा येते. हे टाळण्यासाठी ऐकमेकांना सहकार्य व मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सूत्रसंचालन करून सहशिक्षक रावसाहेब मगर यांनी आभार मानले.
यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे माजी संचालक निलकंठ पाटील,लक्ष्मण देशमुख,सरपंच तानाजी लांडगे,उपसरपंच सिद्धेश्वर राऊत,निलेश भोसले,औदुंबर देशमुख,उल्हास राऊत,आदर्श शिक्षक प्रदिप जाधव,राजेंद्र गुंड,विश्वनाथ पारडे,ग्रामसेवक सिद्धेश्वर माळी,प्रकाश देशमुख अमोल देशमुख,वैजिनाथ व्हळगळ,मंगेश देशमुख, राजाभाऊ भोगे,प्रकाश राऊत, सुरज देशमुख,शुभम देशमुख, रावसाहेब मगर,अभिलाष देशमुख,अनिल क्षीरसागर, कमलाकर दावणे,सचिन क्षीरसागर,शहाजी क्षीरसागर, गंगाराम मोहिते,पिंटू नागटिळक,मोहन क्षीरसागर, मधूकर पाटील,महेबुब शेख,अरुण जाधव,रघुवीर मोटे, बाबासाहेब नरवडे,प्रवीण लटके,यासीन शेख,विजय भोगे यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment