नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते- संजय हळदीकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 25, 2026

नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते- संजय हळदीकर

 नाटक प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते- संजय हळदीकर




अकलूज (कटूसत्य वृत्त):- आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईलमध्ये रमून जात आहेत पण नाटकासारखी कला त्यांना प्रत्यक्ष आयुष्याशी जोडते.संवाद कौशल्य, शरीर भाषा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी नाटक अत्यंत उपयुक्त आहे असे मत कोल्हापूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय हळदीकर यांनी व्यक्त केले.
                अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,मुंबई शाखा अकलूज शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज,विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग,शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज व ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲण्ड टेक्नॉलॉजी, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने नाटकांची परंपरा नव्या पिढीला माहिती होण्यासाठी जिथे शाळा, कॉलेज तिथे रंगमंच हा एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद किल्ला शाळा अकलूज येथे करण्यात आला.या शुभारंभाप्रसंगी संजय हळदीकरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी अमीत पुंज, लाला मुजावर,नितीन बनकर, नागन्नाथ साळवे,केदार लोहकरे, सयाजी मगर,मोतीराम वाघमोडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. शुभारंभा दिवशी जि.प.शाळा शंकरनगर,शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल शंकरनगर या ठिकाणीही शुभारंभाचा प्रयोग करण्यात आला.
हळदीकर म्हणाले,नाटक ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही तर ती जीवन समजून घेण्याची एक प्रभावी कला आहे. ‘जिथे शाळा, कॉलेज तिथे रंगमंच ’ हा उपक्रम मुलांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि अभिव्यक्तीची ताकद वाढवणारा आहे.लहान वयातच मुलांनी नाटकाच्या माध्यमातून विचार मांडायला शिकले, तर ते भविष्यात अधिक संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतील.नाटक करताना टीमवर्क,शिस्त आणि वेळेचे महत्त्व समजते.प्रत्येक भूमिकेला महत्त्व असते.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या कलेचा अनुभव घ्यावा.भीती बाजूला ठेवून रंगमंचावर या स्वतःला व्यक्त करा आणि या सुंदर कलेचा आनंद घ्या.शिक्षकांनीही अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, कारण यातूनच उद्याचे उत्तम कलाकार आणि जागरूक नागरिक घडतील.
            या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रत्यक्ष नियोजन आणि संकल्पना आणि यशस्वी आयोजनासाठी अभिनेते अजय तपकिरे,सुनील कांबळे, डॉ.विश्वनाथ आवड,अमित पुंज, औदुंबर भिसे हे परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages