शेणाच्या गोवऱ्या खरातच्या पोस्टरला खाऊ घालत मनसेचं आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विकृत भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर व जिल्ह्याच्यावतीने विकृत भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात चार हुतात्मा चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी खरातच्या विरोधात अनेक घोषणा देण्यात आल्या.
विकृत भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहे.असेच आंदोलन सोलापूर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा चौक येथे करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके,मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर,प्रकाश कोळी,विश्वास गजभार, गोविंद बंदपट्टे, सोपान महिंद्रकर,वैभव रंपुरे, रविंद्र कांबळे, विठ्ठल बंडा,समर्थ माळगे, अभिषेक इरकल,श्रीराज महिंद्रकर,विनायक माढेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment