संविधान भवन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रच्या स्लॅबचे पूजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

संविधान भवन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रच्या स्लॅबचे पूजन

 संविधान भवन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रच्या स्लॅबचे पूजन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बुधवार पेठ मिलिंद नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मादगी व वाल्मिकी नगर मुन्सिपल कॉलनी येथे जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संचलित नियोजीत संविधान भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅब चे पूजन सोलापूर शहराचे महापौर माननीय विनायक {दादा} कोंड्याल व सोलापूर महानगरपालिका स्थायी समितीच्या चेअरमन सौ. रंजीता{ताई}चाकोते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 या वेळी बोलताना महापौर विनायक दादा कोंड्याल म्हणाले की
 जी.एम संस्था संचलित नियोजित संविधान भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्या प्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोळ्यासमोर ठेवून जी.एम संस्था
गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका केंद्र व तसेच यूपीएससी एमपीएससी व स्पर्धा परीक्षेसाठी तज्ञांचे मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, अद्यावत अशी लायब्ररी, संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय आशा अद्यावत संविधान भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिका केंद्रास सोलापूर महानगरपालिका च्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करूण सहकार्य करण्याच आश्वासन  या वेळी बोलताना महापौर विनायक दादा कोंड्याल व स्थायी समितीच्या चेअरमन सौ.रंजीता ताई चाकोते यांनी दिलं व जीएम संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक केलं.

 या कार्यक्रम प्रसंगी जी.एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे नगरसेविका सौ.श्रीदेवी{ताई}फुलारे जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड जी.एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी उत्सव अध्यक्ष अभि क्षिरसागर आप्पासाहेब बागले  दत्ता शिंदे नरेंद्र शिंदे आप्पासाहेब गायकवाड उमेश गायकवाड यशपाल वाघमारे उमेश लोंढे नेहाल क्षीरसागर पिंटू मेटकरी  संतोष बागले अभिनंदन गायकवाड मॅडी दुपारगुडे प्रभाकर जगताप रुपेश उबाळे अझहर शेख निशांत {काली} वाघमारे रघुराज बनसोडे यशराज बनसोडे निशांत वाघमारे  शिवा भणगे बापू चलवदे आदी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages