लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची दक्षिण भारतात शैक्षणिक सहल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दक्षिण भारतातील कर्नाटक येथे आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी शिरसी, याना, विभूती धबधबा, गोकर्णा, मालपे बीच, श्री क्षेत्र मुरूडेश्वर, कायाकिंग, उडुपी श्रीकृष्ण मंदिर, श्री मंजुनाथस्वामी मंदिर धर्मस्थळ, बंदाजे धबधबा ट्रेक, मैसूर पॅलेस, चामुंडेश्वरी मंदिर, श्री वेणुगोपाळस्वामी मंदिर, वृंदावन गार्डन, जागतिक वारसा स्थळ विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपी येथील विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर व रथ, अंजनाद्री मंदिर आदी पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट दिली. या सहलीसाठी प्रा. आशिष सरकाळे यांचा सहभाग होता. या शैक्षणिक सहलीसाठी मंजुनाथ कुंभार, नक्षत्रा कांबळे, अभिजीत तनपुरे व तृप्ती जाधवर यांनी विद्यार्थी समन्वयक म्हणून कार्य पार पाडले. या शैक्षणिक सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष रोहनजी देशमुख, सचिव डॉ अनिता ढोबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन व सर्व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment