अक्कलकोटमध्ये मावा-गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- मावा व गुटखा विक्रीवर बंदीचे आवाहन करूनही नियम धाब्यावर बसवणाऱ्या विक्रेत्यांवर अक्कलकोट नगर परिषदेने धडक कारवाई करत दंड आकारला. शहरातील विविध दुकानांवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली.
नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, आरोग्य अधिकारी नितीन शेंडगे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या वतीने मावा बंदीबाबत स्पष्ट इशारा देण्यात आला होता; मात्र काही विक्रेते सर्रास विक्री करत असल्याचे आढळून आले.
कारवाईनंतर संबंधितांवर दंडात्मक उपाययोजना करण्यात आल्या. पुढेही नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिक कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, शहरात आरोग्यविषयक नियमांची अंमलबजावणी कडक करण्याची गरज व्यक्त करत नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.
.png)
No comments:
Post a Comment