दौंड-कलबुर्गी-दौंड विशेष शटल रेल्वे गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

दौंड-कलबुर्गी-दौंड विशेष शटल रेल्वे गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी

 दौंड-कलबुर्गी-दौंड विशेष शटल रेल्वे गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी




प्रवासी सेवा संघाची पत्रकार परिषदेत मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दौंड - कलबुर्गी - दौंड विशेष शटल रेल्वे गाडी 28 फेब्रुवारी 2026 नंतर बंद करण्याचे नियोजन आहे. ही महत्त्वाची रेल्वेगाडी बंद न करता मुदत वाढीसह कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी. ही गाडी बंद केल्यास सुमारे 30 किलोमीटर भागातील प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही गाडी पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
       मध्य रेल्वेच्या मुंबई - चेन्नई मेल एक्सप्रेस च्या वेळेत बदल व अनेक रेल्वे स्टेशनचे प्रवासी थांबे रद्द केल्यामुळे ग्रामीण विभागातील प्रवाशांना जिल्हा मुख्यालय असलेले सोलापूर येथे जाण्यासाठी व संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी एक ही सोयीची रेल्वे गाडी नसल्याने दौंड - कलबुर्गी - दौंड विशेष शटल रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. या विशेष रेल्वे गाडीला फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत मंजुरी आहे. यामुळे रेल्वे विभागाकडून मार्च 2026 पासून पुढील कालावधीसाठी मुदत वाढीसह कायमस्वरूपी मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी यापूर्वीच निवेदनाद्वारे प्रवासी सेवा संघाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
        या शटल रेल्वे गाडीला मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रतिसाद मिळत आहे. ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवल्यास विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार, अक्कलकोट व गंगापूर येथे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. त्याचबरोबर पास धारकांच्या संख्येत मोठी वाढ होऊन रेल्वेच्या महसुलात वाढ होणार आहे, असेही यावेळी संजय पाटील यांनी सांगितले.
       या परिसरातील 30 किलोमीटर भागातील लोकांवर ही रेल्वे गाडी बंद केल्यास मोठा परिणाम होणार आहे. रस्ते मार्गावरून जाणे परवडणार नाही तसेच वेळेचा अपव्य होणार आहे. ग्रामीण भागाशी ग्रामीण भागाचा सोलापूरचे संपर्क कमी होण्याची चिंता आहे.
 यामुळे सर्वांच्या सोयीसाठी ही रेल्वे गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, असे स्पष्ट केले आहे
        या पत्रकार परिषदेस सचिव संजय चौगुले, खजिनदार नंदू दळवी आदी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages