वीरशैव लिंगायत समाजाचा 15 मार्च रोजी सामुदायिक विवाह सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

वीरशैव लिंगायत समाजाचा 15 मार्च रोजी सामुदायिक विवाह सोहळा

 वीरशैव लिंगायत समाजाचा 15 मार्च रोजी सामुदायिक विवाह सोहळा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वीरशैव लिंगायत समाज सोलापूर यांच्या वतीने सोलापुरात मल्लिकार्जुन नगरातील मल्लिकार्जुन लॉन, अक्कलकोट रोड येथे वीरशैव लिंगायत समाजाचा रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती श्रीशैल होळळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        महागाईच्या काळात विवाह सोहळा अनेक कुटुंबांसाठी आर्थिक दृष्ट्या मोठा ताण ठरतो. अडचणी येतात, ही बाब लक्षात घेऊन समाज हिताच्या दृष्टिकोनातून हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यात धार्मिक विधी, सुशोभित मंडप, वधू वरांसाठी आवश्यक व्यवस्था, अल्पोपहार तसेच मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 5 मार्च 2026 पर्यंत या विवाह सोहळ्यासाठी इच्छुक वधू-वरांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
समाजातील जास्तीत जास्त कुटूंबांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुला मुलींचे विवाह साधेपणाने, पण सन्मानाने पार पाडावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
 अधिक माहितीसाठी विकास हिरेमठ 9146166636 , बसवराज अहिरवाडी 9841310116 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
          या पत्रकार परिषदेस गणेश माळी, बसवण्णा कटारे, विकास हिरेमठ, प्रकाश केसरे, राहुल जत्ती आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages