माढ्यात यशवंत फाउंडेशनकडून वह्या, चरित्रपर पुस्तकांचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

माढ्यात यशवंत फाउंडेशनकडून वह्या, चरित्रपर पुस्तकांचे वाटप

 माढ्यात यशवंत फाउंडेशनकडून वह्या, चरित्रपर पुस्तकांचे वाटप




माढा (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माढ्यातील यशवंत फाउंडेशनने शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप केले. शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, मुलांची शाळा क्रमांक दोन व उर्दू शाळा या शाळांमध्ये यशवंत फाउंडेशनने शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप केले. महापुरुषांच्या चरित्राची शंभर पुस्तके भेट म्हणून दिली. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देविदास खरात, संतोष जुगदार, सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिनेश जगदाळे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश माळी यांनी केले. वह्यांचे वाटपप्रसंगी देविदास खरात, डॉ. यू. एफ. जानराव, गणेश मोरे, बापू राऊत, दत्तात्रय राऊत, शिवाजी माने, किरण पवार, रवी सरवदे, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages