Hot Posts

6/recent/ticker-posts

विमान अपघातामागे कुणाचा हात? ती व्यक्ती कोण?

 विमान अपघातामागे कुणाचा हात? ती व्यक्ती कोण?


रोहित पवारांचा सनसनाटी आरोप

बारामतीमध्येही एफआयआर दाखल करण्यास पोलिसांचा नकार 






बारामती (कटूसत्य वृत्त):- अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणात DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक दिसले. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विमान अपघातामागे कुणाचा हात आहे ,यावरून मोठे भाष्य केले. त्यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा उल्लेख पण केला. व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या जवळ अनेक लोक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या बोलण्याचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा आता होत आहे.

FIR दाखल झाला पाहिजे

 बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी गुन्हा दाखल करण्याविषयी पुन्हा आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले की विमान अपघात हा गुन्हा १०० टक्के दखल पात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल केला जात नाही. अजितदादांची दखल घेतली जात नाही असं व्यक्तीमत्त्व होतं का. सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करा. आमचं काही म्हणणं नाही. पण एफआयआर दाखल करण्यात आला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली केली आहे.

कॉज ऑफ अॅक्शन आला आहे. त्या आधारे एफआयआर दाखल झाला पाहिजे. दादांना न्याय का मिळत नाही. एफआयआर का दाखल करत नाही. आम्ही चुकीचा एफआयआर दाखल करत असू तर आमच्यावर कारवाई करा. आम्हाला तुरुंगात टाका. पण ऐकत नाही. कुणाला तरी वाचवलं जात आहे. कुणाचा तरी प्रेशर आहे. पोलीस अशा पद्धतीने वागत असल्याने हा घातपात आहे का हा संशय निर्माण होत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

अपघातामागे कुणाचा हात?

व्हीएसआर कंपनीचे मालक अनेक मोठ्या लोकांच्या जवळचे आहेत. रोहित सिंगच्या लग्नाला महाराष्ट्रातील मोठा नेता गेला होता. आंध्राचा नेता गेला. त्याच्या एनबीएससी कंपनीला रोहित सिंगने मोठा निधी दिला. त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादांना खराब विमान दिलं हे डीजीसीए सांगतं. त्यामुळे हे विमान मुद्दाम दिलं का. यामागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे असा सवाल रोहित पवार यांनी केला. चौकशी अपघतावर होतेय. चौकशी कराच. पण घातपात आहे का, क्रिमिनिल अँगल आहे का याचीही चौकशी करा. ते केलं जात नाही. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे. हा संशय आहे, असा मोठा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला.

तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतरही एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले.

काय म्हणाले रोहित पवार?

"दोन दिवसांपूर्वी डीजीसीए एक रिपोर्ट आलेला सर्वांनी पाहिला. हा २४ फेब्रुवारीचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टनंतर काल मी सर्वपक्षीय आमदार मुंबईमधील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तिथे गेलो. त्याठिकाणी अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत जो रिपोर्ट दिला आहे. त्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडून निष्काळजीपणा झाल्याचा थेट आरोप आहे. त्यावरुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली होती," असं रोहित पवार यांनी सांगितले.

तसेच "मी मुंबईला एफआयआर करु शकत होतो तो एफआयआर ट्रान्सफर करता आला असता, मात्र तो त्यांनी स्वीकारला नाही. सेक्शन १७३ अंतर्गत या देशातील कोणत्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी प्रकरणात असा निकाल दिला आहे. तुमच्यापैकी कोणीही एफआयआर केला तरी स्विकारला पाहिजे. याआधी ३०-३१ लाही आपण केस करु शकलो असतो, कारण सखोल माहिती येऊ द्या," अशी आमची भूमिका होती.

पुढे बोलताना रोहित पवार सांगितले की, "जर व्हीएसआरची विमाने उडण्यास बंदी घातली आहे तर अजित पवारांना खराब विमान का दिले गेले? ते चुकून दिले गेले की मुद्दाम दिले गेले? अजित पवार यांच्या विमानचे कंडीशन चांगले असल्याचे कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितले? याबाबतचा तपास व्हावा, यासाठी आम्ही एफआयआर करत आहोत. ऍरो नावाच्या कंपनीवर एफआयआर करा असं आम्ही सांगितले. विमान उड्डाण घेण्यास योग्य हवामान आहे असं कोणी सांगितले त्यांची चौकशी झाली पाहिजे.

"गेले दोन तास चर्चा केल्यानंतरही असं करता येत नाही, असं पोलिसांचे म्हणणे आहे, कारण अपघाताचा गुन्हा नोंद आहे. दादांचे आत्तापर्यंत अपघात झाला आहे, एवढीच नोंद आहे. मात्र यामागे घातपातचा संशय किंवा गुन्हेगारी कृत्य आहे त्याबाबतच्या तपासाचे काय होणार आहे? त्याबाबत कुठेही गुन्हे घेतले जात नाहीत. कालही अधिकाऱ्यांवर दबाव होता, तसाच दबाव बारामतीमधील पोलिसांवरही जाणवत आहे. इथे १०० वकिलांची फौज आहे, आम्ही आणखी काहीवेळ थांबूून निर्णयाची वाट पाहू, असं रोहित पवार म्हणाले.

एफआयआर का नको आहे? एफआयर घेण्यास टाळाटाळ का होत आहे? सुशांत सिंग राजपुतचा मुद्दा किती तापवला गेला. तो तर महाराष्ट्राचाही नव्हता. अजित पवार यांची दखल घेऊ नये असे शासन सांगत आहे का? आम्ही जो एफआयआर दाखल करत आहोत तो चुकीचा असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, असंही रोहित पवार म्हणाले.


Reactions

Post a Comment

0 Comments