शिवरत्न सेमी मध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करणार- शितलदेवी मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

शिवरत्न सेमी मध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करणार- शितलदेवी मोहिते पाटील

 शिवरत्न सेमी मध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करणार- शितलदेवी मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- उत्साह, आनंद आणि टाळ्यांच्या कडकडाटात, शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा, अकलूज मधील स्मृतिभवन या ठिकाणी दिमाखात पार पडला. 
आकर्षक सजावट, रंगीबेरंगी प्रकाशयोजना आणि विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करून, शिवरत्न उत्सवाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस पं. स. गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे,  अध्यक्षस्थानी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा  शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होत्या तर रीलस्टार आर. जे.सागर भालेराव, ताराराणी कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा कु. ईशितादेवी धैर्यशील मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, सदस्य नितीन बनकर, शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे चेअरमन रामकृष्ण काटकर, सदस्य  एच डी भोसले, शंकर गायकवाड, शिवदत्त नारायणकर, यशवंत नगर केंद्राचे केंद्रप्रमुख विठ्ठलराव काळे, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा यशवंतनगरचे मुख्याध्यापक बंडू खडतरे, एस एम पी स्कूलचे प्राचार्य अल्बर्ट थारकन , शिवरत्न स्कूलच्या प्रिन्सिपल सौ बिनो पाऊलसो, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन बोरावके , शिवरत्न अकॅडमीचे प्रमुख राजकिरण माने देशमुख , मॅथ्स ओलंपियाडच्या संचालिका मेघा घुले यांची उपस्थिती लाभली. 
             यावेळी मनोगत व्यक्त करताना शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2026- 27 साठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत, पालक आणि शिक्षकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र माने देशमुख यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इयत्ता आठवीतील कु.ज्योती औदुंबर सावंत आणि कु. प्रणाली श्रीनिवास मुळे या दोघींनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages