अकलूज येथे डीजेचा धुमाकुळ, ११ शिवजयंती मंडळावर गुन्हे दाखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

अकलूज येथे डीजेचा धुमाकुळ, ११ शिवजयंती मंडळावर गुन्हे दाखल

 अकलूज येथे डीजेचा धुमाकुळ, ११ शिवजयंती मंडळावर गुन्हे दाखल




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलुज पोलीस ठाणेस शिवजंयती उत्सव २०२६ मिरवणुकीतील मंडळ व डीजे धारकांवर ध्वनी प्रदुषण कायदया अंर्तगत ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

     अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण व प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांनी, सोलापुर जिल्हयातील सर्व शिवजंयती उत्सव मंडळे व शिवप्रेमी नागरिकांची, शिवजयंती उत्सव २०२६ चे अनुषंगाने,पोलीस मुख्यालय सोलापुर ग्रामीण येथे बैठकी आयोजित केली होती. सदर बैठकीत सोलापुर ग्रामीण हद्दीतील नागरीकाना, शिवजयंती मिरवणुकीत डिजे,डॉल्बीचा वापर न करता, पारंपारिक  वाद्यांचा वापर करण्याचा व शिवजंयती उत्सव कालावधीत सामाजिक उपक्रम राबविण्याचे अहवान करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने अकलुज पोलीस ठाणेस  संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग व  निरज उबाळे पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे यांनी अकलुज पोलीस ठाणे  हद्दीत शिवजयंती उत्सव २०२६ हा शांततेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन हद्दीतील सर्व शिवजंयती उत्सव मंडळे, डिजे व डॉल्बीधारक चालक तसेच नागरीकाची बैठक घेवुन शिवजंयती मिरवणुकीत डिजे डॉल्बीचा वापर न करता, पांरपारिक वाद्यांचे वापर करुन, मिरवणुक शांततेत पार पाडण्याचे व उत्सव कालावधीत सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. मिरवणुकी दरम्यान ध्वनी प्रदुषण कायदयाचे  उल्लंघन  होणार नाही याची दक्षता घेणेबाबत,  सर्व मंडळांना सुचना देवुन त्यांना भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीस देण्यात आल्या होत्या.

दिनांक २०/०२/२०२६ रोजी अकलुज शहरातील वेगवेगळ्या शिवजंयती उत्सव मंडळाने मिरवणुकीत मोठ्या आवाजात डिजे/डॉल्बी व लेजर शोचा वापर करुन सार्वजनिक शांतता भंग करुन, सामान्य नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करुन,ध्वनीप्रदुषण कायदयाचे उल्लंघन केले तसेच,  जिल्हाधिकारी सोलापुर यांचे कडील जा.क. २०२६/डिसीबी-२/आरआर-११० दिनांक १२/०१/२०२६ चे आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन, अकलुज पोलीस ठाणे हद्दीतील ११ शिवजयंती उत्सव मंडळ व डिजे/डॉल्बी चालकांविरुध्द अकलुज पोलीस ठाणेस, भारतीय न्याय संहिता २०२३ वे कलम २२३,२ (१) व ध्वनी प्रदुषण अधिनियत २००० चे कलम ३,४,८ व पर्यावरण संरक्षण अधिनियत १९८६ चे कलम १५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्याचा तपास चालु आहे.

*चौकट* 
गुन्हे दाखल असलेल्या मंडळाची व डिजेधारकांची नावे व त्यांनी उल्लंघण केलेल्या ध्वनीप्रदुषण पातळी खालील प्रमाणे...
हिंदवी प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे / 108 डेसीबल, 
लहुजी साम्राज्यप्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे/115 डेसीबल, 
सहयाद्री प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे/105 डेसीबल, 
छावा ग्रुप शिवंजयती उत्सव मंडळ अकलूज, व डिजे/105 डेसीबल, 
स्वराज्य प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ यशवंतनगर, व डिजे/112 डेसीबल, 
नवक्रांती प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे/117 डेसीबल, 
शिवदत्त प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलूज, व डिजे/110 डेसीबल, 
रामरहिम प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे 118 डेसीबल, 
संभाजीराजे प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे/125 डेसीबल, 
शिवमुद्रा प्रतिष्ठाण शिर्वजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे/110 डेसीबल, 
महाराज प्रतिष्ठाण शिवंजयती उत्सव मंडळ अकलुज, व डिजे/107 डेसीबल,

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages