सिमेंट कंपनीतील १३२ केव्हीए ट्रान्स्फॉर्मरला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

सिमेंट कंपनीतील १३२ केव्हीए ट्रान्स्फॉर्मरला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

 सिमेंट कंपनीतील १३२ केव्हीए ट्रान्स्फॉर्मरला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही




सोलापूर (कटूसत्य वृत्त): दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी परिसरातील Chettinad Cement कंपनीच्या १३२ केव्हीए ट्रान्स्फॉर्मरला गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. तातडीने अग्निशमन उपाययोजना राबविल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वीज वितरण कंपनीचा १३२ केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर आहे. गुरुवारी सायंकाळी अचानक ठिणगी उडून ट्रान्स्फॉर्मरला आग लागली. सुरुवातीला कंपनी प्रशासनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ज्वाळा आणि धुराचे लोळ दूरवरून दिसत होते.

आगीची माहिती मिळताच एनटीपीसी कंपनी तसेच जयहिंद शुगर कंपनीकडून पाण्याचे बंब मागविण्यात आले. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. ही माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी दिली.

आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यात किती आर्थिक नुकसान झाले याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र, कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages