मोहोळ तालुक्यात ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

मोहोळ तालुक्यात ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

 मोहोळ तालुक्यात ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर




मोहोळ (कटूसत्य वृत्त): तालुक्यातील तब्बल ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू झाली असून गावागावांत प्रचाराची रणनीती आखली जात आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे –
सावळेश्वर, सय्यद वरखडे, सौंदणे, कुरुल, पेनूर, चिंचोलीकाटी, घोडेश्वर, कामती खुर्द, अंकोली, कोरवली, भोयरे, नरखेड, पापरी, शेटफळ, आष्टी, देवडी, खंडाळी, पोखरापूर, कोळेगाव, चिखली, हिवरे, बिटले, गलांडेवाडी, वाघु, मनगुळी, बोपळे, एकुरके, घाटणे, वडवळ, आष्टे, मुंढेवाडी, पोफळी, हिंगणी (नि), लांबोटी, तेलंगवाडी, आंगर, आडेगाव, रामहिंगणी, सिद्धेवाडी, वडाचीवाडी, टाकळी (सि.), नजीकपिंपरी, येवती, खवणी, वरकुटे, शेजबाभुळगाव, तांबोळे, येणकी, कोथळे, मिरी, वटवटे, औंढी, परमेश्वरपिंपरी, इंचगाव, वाघोली, पाटकुल, अर्जुनसोंड, भांबेवाडी, विरवडे खुर्द, येलमवाडी, मसले चौधरी, काटेवाडी, शिरापूर (मो.), ढोकबाभुळगाव, शिरापूर (सो.), दादापूर, हरळवाडी, जामगाव बु., शिंगोली तरटगाव, पिरटाकळी आणि नांदगाव.

निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करणे, छाननी, माघार आणि मतदानाची तारीख लवकरच जाहीर होणार असून, तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील या निवडणुका स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages